कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, तमिळनाडूच्या राज्यपालांनी बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने १४ जून रोजी बालाजी यांना कथित कॅश फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी (नोकऱ्यांसंबंधीचा घोटाळा) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. सेंथील बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप असल्याचे तामिळनाडू राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांची तत्काळ प्रभावाने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.

नोकऱ्या देण्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे घेणं आणि मनी लाँड्रिंगसह बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तसेच याप्रकरणी तपास सुरू असून बालाजी आपल्या मंत्रीपदाचा वापर करून तपासात अडथळे आणत आहेत, कायदेशी प्रक्रियेत अडथळे आणत आहेत असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. पदाचा गैरवापर करून ते तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण करत असल्याचे सांगत त्यांच्यावर ही करवाई करण्यात आली आहे. बालाजी यांच्याविरोधात पीएमएलए आणि भारतीय दंड विधानाच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना अटक केली. परंतु पोलीस कोठडीत असताना चौकशीदरम्यान अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. ईडी आणि बालाजी यांच्यातील संघर्ष आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी मद्रास हाय कोर्टात बुधवारी तब्बल १६ तास मॅरेथॉन सुनावणी पार पडली. बालाजी यांच्यावरील कारवाई वैध की अवैध यावर सध्या न्यायलयात सुनावणी सुरू आहे. अशातच बालाजी यांच्यावर आणखी एक कारवाई झाली आहे.

Story img Loader