तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना शोरमा नं खाण्याची विनंती केली आहे. कारण शोरमा हा भारतीय खाद्य पदार्थ नाही असं ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना सुब्रामण्यम म्हाणाले की इतर पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामुळे शोरमासारखा आरोग्यावर परिणाम करू शकतो असा पदार्थ खाणं टाळा.

“शोरमा हा पाश्चात्य खाद्य पदार्थ आहे. तो तिथल्या हवामानामुळे तिथल्या लोकांना त्रासदायक ठरत नाही. पाश्चिमात्य भागात तापमान अतिशय कमी असते. त्यामुळे तिथे अश्या प्रकारचे पदार्थ खराब होत नाहीत. पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. असे मांसाचे पदार्थ व्यवस्थित फ्रिजरमध्ये ठेवले नाही तर ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. आणि असे खराब पदार्थ आपण खाल्ले तर ते आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं” असंही ते म्हणाले.

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम हे शोरमा ही पाश्चात्य डीश असल्याचं जरी म्हणत असले तरी शोरमा हे मध्य-पुर्वेकडील सर्वात लोकप्रिय असे स्ट्रीट फुड आहे. सुब्रमण्यम पुढे म्हणाले की आपल्या देशातील बहुतांश शोरमाच्या दुकानात स्टोरेजची आवश्यक आणि योग्य व्यवस्था उपलब्ध नाही. शोरमा या पदार्थाला प्रचंड मागणी असल्यामळे दुकानदार कुठलीही काळजी नं घेता शोरमा विकतात.

हे पदार्थ आपल्या हवामानाच्या परिस्थितीशी जुळतील की नाही याचा कोणीही विचार करत नाही. हे पदार्थ विकणारे दुकानदार याबाबत योग्य काळजी घेत नाहीत आणि फक्त व्यवसायीक विचार करतात. दोन-तीन तक्रारीनंतर आम्ही राज्यातील अन्न सुरक्षा विभागाला राज्यातील सर्व दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक दुकानांना नियमांचा भंग केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आम्ही ही तपासणी मोहीम आता कायम सुरू ठेवणार आहोत असंही ते म्हणाले.

केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील एका दुकानातून खाल्लेल्या शोरमामुळे ५८ लोकं आजारी पडले आणि एका तरूणीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या नंतर या दुकानातील शोरमाचे नमुने प्रयोग शाळेत तपासले असता त्यात हानीकारक बॅक्टेरीया तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Story img Loader