वजन कमी करण्यासाठी हल्ली शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग अवलंबला जातो. आपलं वजन नियंत्रणात असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रमाणापेक्षा अधिकचं वजन स्थूलपणा आणि इतर अनेक आजारांना निमंत्रण देणारं तर असतंच, त्याशिवाय एखाद्याच्या दैनंदिन हालचालीवरही त्यामुळं मर्यादा येतात. चेन्नईमध्ये १५० किलो वजन असलेल्या एका २६ वर्षीय तरूणाने शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्याच्या जीवावर बेतला. चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असताना अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातच सदर तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर आता तमिळनाडूचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यम यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुद्दुचेरीमधील हेमचंद्रन नावाच्या २६ वर्षीय तरुणाने चेन्नईमधील पम्मल भागात असलेल्या बीपी जैन रुग्णालयात चयापचय आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी करणारी) करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि. २३ एप्रिल) सकाळी ९.३० वाजता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली. शस्त्रक्रिया सुरू असताना १०.१५ वाजता हेमचंद्रनच्या हृदयाच्या ठोक्याची गती कमी झाली. त्यानंतर त्याला रेला रुग्णालयात हलविण्यात आले. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्रीच त्याची प्राणज्योत मालवली. रेला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही आता विविध चाचण्या करत असून त्यातून मृत्यूचे कारण तपासत आहोत.

Health Special : जाणून घ्या लठ्ठपणावरचे विविध उपचार

आरोग्य मंत्री सुब्रमण्यम म्हणाले की, हेमचंद्रणच्या पालकांनी मला फोन केला होता. शोकाकुल पालकांना मी आश्वस्त केलं की, या प्रकरणाची चौकशी करून मृत्यूचं नेमकं कारण काय? याचा शोध घेऊ. दरम्यान वैद्यकीय सेवा संचालनालयाने या प्रकरणात वैद्यकीय पथकाकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचे म्हटले आहे.

‘लठ्ठपणा’ वाढण्याची काही महत्वाची कारणे..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमचंद्रनच्या पालकांनी उत्तरीय तपासणीसाठी नकार दिला आहे. तसेच राज्य वैद्यकीय परिषदेला त्यांच्याकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. पुद्दुचेरीचे अण्णाद्रमुक पक्षाचे अतिरिक्त सचिव व्ही. मणीकंदन यांनी मात्र मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्र सरकारला विनंती करून एम्स कडून हेमचंद्रनच्या मृत्यूचा तपास करावा, असे ते म्हणाले. तसेच तमिळनाडू सरकारने सदर रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशीही मागणी त्यांनी केली.