भारतीय वंशाच्या एका अकरा वर्षांच्या अमेरिकी मुलाने वयाच्या अकराव्या वर्षी पदवी मिळवली असून त्याने त्याच्या जोडीला गणित, विज्ञान, परराष्ट्र भाषा या इतर तीन संलग्न पदव्याही मिळवल्या आहेत.
तनिष्क अब्राहम हा मूळ कॅलिफोर्नियातील सॅक्रॅमेन्टो येथील रहिवासी असून तो अमेरिकन रिव्हर कॉलेजमधून पदवीधर झाला आहे. तेथे १८०० विद्यार्थी शिकतात. त्याने सगळे शिक्षण मात्र घरीच पूर्ण केले आहे. अमेरिकन रिव्हर कॉलेजमधून पदवीधर होणारा तो यावर्षीचा पहिलाच तरूण पदवीधर आहे. अमेरिकन रिव्हर कॉलेजचे प्रवक्ते स्कॉट क्रो यांनी सांगितले की, बहुदा तो आतापर्यंतचा सर्वात तरूण पदवीधारक असावा. वयाच्या सातव्या वर्षांपासून अब्राहम याला घरी शिकवण्यात आले. त्याने गेल्या वर्षी एक परीक्षा दिली व माध्यमिक पदविकेसाठी पात्र ठरला. त्याच्या या कामगिरीने अध्यक्ष बराक ओबामा यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. त्यांनी तनिष्कला अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. अब्राहम याने मेन्सा चाचणी वयाच्या चौथ्या वर्षी दिली. अब्राहम याने सांगितले की, वयाच्या अकराव्या वर्षी पदवीधर झालो असलो तरी आपल्यासाठी ती मोठी गोष्ट नाही.
त्याची आई ताजी अब्राहम यांनी सांगितले की, तो वर्गात नेहमीच पुढे होता. किंडरगार्टनला असतानाच तो काही वर्षे पुढे होता. त्याने सांगितले की, काही मुलांना आपली भीती वाटायची तर काही मुलांना अभिमान वाटायचा.  त्याने पदवी प्राप्त केली असून इतर तीन पदव्याही मिळवल्या आहेत. त्याने डॉक्टर व्हायचे आहे, वैद्यक संशोधक व्हायचे आहे व अमेरिकेचा अध्यक्ष व्हायचे आहे अशी उत्तरे पुढे कोण व्हायचे आहे याबाबत दिली.
फॉक्स न्यूजला त्याने सांगितले की, आपल्याला शिकण्याची आवड होती त्यामुळे आपण येथपर्यंत पोहोचू शकलो.

Story img Loader