प्रख्यात शास्त्रज्ञ तपन मिश्रा यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहमदाबाद येथील स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या (सॅक) प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.
सध्या या केंद्राच्या सूक्ष्म लहरी सुदूर संवेदन क्षेत्राच्या उपसंचालकपदी असलेले मिश्रा हे ए. एस. किरण कुमार यांची जागा घेतील. कुमार यांची गेल्या महिन्यात इस्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मिश्रा हे इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयातील ‘इनोव्हेशन्स मॅनेजमेंट’ कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही काम पाहात आहेत.
कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशची पदवी घेतलेल्या मिश्रा यांनी ‘सॅक’मध्ये डिजिटल हार्डवेअर अभियंता म्हणून करियरची सुरुवात केली. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका पार पाडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा