CJI डी. वाय. चंद्रचूड यांनी खटल्यांची सुनावणी टळणं आणि लांबणं यावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी सनी देओलच्या दामिनी सिनेमातील ‘तारीख पे तारीख’ या संवादाचीही आठवण करुन दिली. आम्हाला असं मुळीच वाटत नाही की तारीख पे तारीख असाच न्यायालयाचा अर्थ काढला जावा. जर आवश्यकता असेल तरच सुनावणी पुढे ढकलली पाहिजे. मी जी माहिती मागवली आहे त्यानुसार आत्तापर्यंत १७८ प्रकारणं टाळण्याची, पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिना संपला तोपर्यंत ३ हजार ६८८ प्रकरणात ही मागणी झाली आहे. ही बाब चिंताजनक आहे असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रचूड यांनी केलं महत्त्वाचं आवाहन

प्रकरणांची सुनावणी टळली किंवा लांबली तर मग सुनावणी लवकर घेण्याचा हेतूच अपयशी ठरतो. जर तारीख पे तारीखच मिळत राहिली तर लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. मी सगळ्यांना हे आवाहन करतो आहे की जर गरज नसेल तर पुढची तारीख देऊ नका, सुनावणी लांबवू नका किंवा टाळू नका.

हे पण वाचा- सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांची प्रकृती बिघडली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी थांबवून केली मदत

सुनावणीसाठी पुढची तारीख मागणंही चुकीचं

सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड म्ङणाले सप्टेंबर महिन्यात २३६१ प्रकरणं अशी आहेत ज्यामध्ये पुढची तारीख मागण्यात आली आहे. अशा प्रकारची मागणी करणं हेच चुकीचं आहे. अशा प्रकारे तारखाच पडत राहिला तर लोक न्यायालय म्हणून आपल्यावर विश्वास कसा काय ठेवतील?

महत्त्वाची बाब ही आहे की आत्ताच नाही तर याआधीही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी तारखा पडण्यावरुन एका वकिलाला खडे बोल सुनावले होते. तसंच चंद्रचूड यांनी एका वकिलाला कोर्टात मोबाइलवर बोलत असल्याच्या कारणावरुनही तंबी दिली होती. हे न्यायालय नाही तर बाजार आहे तुम्ही इथे फोनवर बोलू नका, यांचा फोन जप्त करा असं म्हणत न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचा फोनही जप्त करण्याचा आदेश चंद्रचूड यांनी दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tareekh pe tareekh sunny deol dialogue cji expressed concern over postponement of hearing of cases scj
Show comments