Chinese Premier Reacts Li Keqiang On Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणामुळे जगभरातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक देशांमधील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने चीनवर आधी ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. मात्र, त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावलं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनी मालावर १०४ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला. यानंतर आता चीननेही मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादल्यानंतर चीनने अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणखी तीव्र झालं आहे. याचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त आयात शुल्क लादलं तरी चीन २०२५ मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या भाग असेल असा अशावाद चीनी पंतप्रधान ली केकियांग यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी मंगळवारी झालेल्या चर्चेत चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाबाबत भाष्य केलं. ली केकियांग यांनी यांनी म्हटलं की, “आम्ही या परिस्थितीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार असून चीन पूर्णपणे सक्षम आहे. चीन कोणत्याही बाह्य धक्क्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. अतिरिक्त आयात शुल्क लादले असले तरी देखील जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये शाश्वत आर्थिक वाढ चीन करेल”, असं ली केकियांग यांनी म्हटलं आहे.

चीनचा हितसंबंध तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे रक्षण करणे, तसेच अमेरिकेचे शुल्क हे एकतर्फीपणा, संरक्षणवाद आणि आर्थिक जबरदस्तीचे उदाहरण आहे. पण हा संरक्षणवाद काहीही घेऊन जाणार नाही. अर्थव्यवस्थेत खुलेपणा आणि सहकार्य हेच सर्वांच्या हिताचं आहे. चीनच्या आर्थिक धोरणांमध्ये विविध अनिश्चितता पूर्णपणे लक्षात घेतल्या आहेत. याचा अर्थ असा की ट्रम्प यांच्या आयात शुल्काला तोंड देण्यासाठी चीन तयार आहे”, असं ली केकियांग यांनी म्हटलं आहे.