महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना बुधवारी न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तेजपाल यांना कारागृहात स्वतंत्र खोलीमध्ये ठेवावे, असाही आदेश न्यायालयाने दिला.
‘तहलका’तील एका महिला पत्रकाराने तेजपाल यांच्यावर गोव्यामध्ये ७ आणि ८ नोव्हेंबरला झालेल्या कार्यक्रमावेळी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर तेजपाल यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३५४ (ए) आणि ३७६ (२) (के) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर गोवा पोलीसांनी त्यांच्यावर ३४१ आणि ३४२ नुसारही गुन्हा दाखल केला होता. तेजपाल यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या या प्रकरणी चौकशी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तेजपाल यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
तेजपाल यांना कारागृहात स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्य केली. तेजपाल यांच्या कामाचे स्वरुप लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणीही वकिलांनी केली. त्यावर न्यायालय शुक्रवारी निकाल देणार आहे.