‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल शुक्रवारी चौकशीसाठी गोवा पोलीसांपुढे हजर होणार आहेत. तसा फॅक्स त्यांनी गोवा पोलीसांकडे पाठविला असल्याचे त्यांचे वकील संदीप कपूर यांनी सांगितले. तेजपाल यांनी आपली अटकपूर्व जामीनासाठीची याचिकाही गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयातून मागे घेतली.
चौकशीसाठी हजर होण्यास शनिवारपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी तेजपाल यांनी गोवा पोलीसांकडे गुरुवारी सकाळी केली होती. मात्र, गोवा पोलीसांनी त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी चौकशीसाठी हजर होण्याचा निर्णय घेतला. महिला पत्रकाराने तेजपाल यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांनी त्यांना गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले होते.
‘तहलका’च्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांचा राजीनामा
पीडित महिलेसोबत तेजपाल लिफ्टमध्ये जातानाचे चित्रीकरण पोलीसांच्या हाती

Story img Loader