सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आणखी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्यावर निर्णय देताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.क्षमा जोशी यांनी पोलिसांची मागणी मान्य करत तेजपाल यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. तरुण तेजपाल सध्या वास्को येथील तुरुंगात असून प्रकरणाची सविस्तर चौकशी पोलिस करत आहेत.तरुण तेजपाल यांना गेल्या ३० नोव्हेंबर रोजी लैंगित अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Story img Loader