महिला पत्रकार लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तहलकाच्या तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालीयन दंडाधिका-यांनी तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.
गोवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, त्यांनी तेजपाल यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ मागितली होती.  याआधी त्यांना अटक झाल्यावर १२ दिवसांची कोठडी देण्यात आली होती, जिची मुदत आज शनिवारी संपली. ३० नोव्हेंबर रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान लिफ्टमध्ये सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तेजपाल यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम ३५४, ३७६ आणि ३७६(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader