महिला पत्रकार लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तहलकाच्या तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालीयन दंडाधिका-यांनी तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.
गोवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, त्यांनी तेजपाल यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ मागितली होती. याआधी त्यांना अटक झाल्यावर १२ दिवसांची कोठडी देण्यात आली होती, जिची मुदत आज शनिवारी संपली. ३० नोव्हेंबर रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान लिफ्टमध्ये सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तेजपाल यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम ३५४, ३७६ आणि ३७६(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तरूण तेजपाल यांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ
महिला पत्रकार लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तहलकाच्या तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarun tejpals police custody extended for 10 days