ओदिशा येथे अवैध खाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. एम.बी. शाह समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून टाटा, बिर्ला, सेल यांच्यासह ७० कंपन्यांनी पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे या अहवालात ओढण्यात आले आहेत. १९९४-९५ नंतर ओदिशात पर्यावरणविषयक नियम, मानके आणि वन कायद्यांची मोठय़ा प्रमाणात पायमल्ली झाल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे. खाणींचे कंत्राट असलेल्या प्रत्येक कंपनीने अशा कायद्यांचे आणि मानकांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लंघन केले आहे. सुमारे ४५ हजार ४५३ कोटी रुपये किमतीचे लोहखनिज आणि ३ हजार ८९ कोटी रुपयांचे मँगेनीज बेकायदेशीरपणे उपसण्यात आले आहे.

विशेष निरीक्षणे
*  ओदिशा सरकारच्या मालकीच्या ‘ओदिशा मायनिंग कॉर्पोरेशन’कडूनही नियम धाब्यावर
* १९२ खाणींपैकी ९४ खाणींना पर्यावरण खात्याची मंजुरी नाही
* अशा ९४ खाणींपैकी ७८ खाणींकडून १९९४ पासून लोहखनिजाचा उपसा सुरू
* ९६ खाणींनी मंजुरी मिळण्याआधीच खाणकाम सुरू केले
* १३० खाणींमध्ये अवैध कामे सुरू
* या सगळ्या उत्पादनाच्या किमतीची दंड रकमेसह वसुली शक्य
* सेल, टाटा स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, आधुनिक मेटॅलिक, बिर्ला, इंदिरा पटनाईक, सिराजुद्दीन अँड कं., पटनायक मिनरल्स अशा मातब्बर कंपन्यांचा उल्लंघनकर्त्यांमध्ये समावेश

Story img Loader