बाजारात कंपनीच्या घसरलेल्या विक्री दराला वाढविण्याच्या उद्देशाने टाटा मोटार्स कंपनीने आज बुधवार आठ सुधारीत कार बाजारात दाखल केल्या आहेत. यात टाटा नॅनोचा ‘सीएनजी’ मॉडेलचाही समावेश आहे. त्याचबरोबर टाटा इंडीका कारचाही सीएनजी मॉडेल बाजारात दाखल करण्यात येणार आहे. सिदान इंडीगो मॉडेलमध्येही काही नव्याने बदल करण्यात आले आहेत.
टाटाची स्पोर्टस् कार सफारी स्ट्रोम आणि युटिलिटी कार सुमो गोल्ड यांचेही सुधारीत मॉडेल्स टाटा कंपनी बाजारात आणणार आहे. “गेले दोन महिने बाजारात विक्रीदर खालावला होता. पण, या नव्या सुधारित आवृत्यांमुळे विक्री दरात फरक पडेल अशी आम्हाला आशा आहे. ग्राहकही यांना चांगला प्रतिसाद देतील” असे टाटा मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्ल्यॅम पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा