जगभरातील नामवंतांनी आणि सेलिब्रिटींनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्याचे खळबळजनक वृत्त प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर बुडवाणाऱ्यांना गंभीर इशारा दिला. केंद्र सरकारकडून गेल्यावर्षी परदेशातील अवैध संपत्ती जाहीर करण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र, या संधीचा फायदा न उचलता अशाप्रकारची करचुकवेगिरी करणे महागात पडेल, असा इशाराच जेटलींनी दिला.
THE PANAMA PAPERS : करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीय कंपन्या, अमिताभ, ऐश्वर्यासह अनेकांची नावे
करचुकवेगिरी करून इतर देशात काळा पैसा लपवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी २०१७ पासून जागतिक पातळीवर उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे देशाबाहेर काळा पैसा लपवणे खूपच अवघड होणार आहे. जी-२० राष्ट्रांच्या यासंदर्भातील उपाययोजना पुढील वर्षापासून लागू होतील. त्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होणार असून त्यामुळे संबंधितांना करचुकवेगिरी करणे महाग पडेल, असे जेटलींनी सांगितले.
जगभरातील नामवंतांनी आणि सेलिब्रिटींनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध पत्रकारितेतील संस्थांनी विविध कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आणले आहे. या यादीतील नावांमुळे जगभरात अनेकांना धक्का बसला आहे. यादीतील भारतीय नावांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन, डीएलएफचे प्रवर्तक के पी सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत यांचासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यादीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावेही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा