गोव्यातील खाण उद्योग सुरू झाल्यानंतरच हवाई इंधन करावर सवलत देण्याचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात खाणकाम सुरू झाल्यानंतर हवाई इंधन करावर सध्या आकारण्यात येत असलेला १२ टक्के मूल्यवर्धित कर पाच टक्क्य़ांवर आणण्याचा विचार करता येईल, असे पर्रिकर यांनी सांगितले. सध्या राज्यातील खाण उद्योग बंद असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सरकारला मोठय़ा महसुलास मुकावे लागले आहे. हे प्रमाण २५ टक्के असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, दाभोळी विमानतळावर सध्या अतिरिक्त इमारत उभारण्यात येत असली तरी दर वर्षी या विमानतळावरून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ४० लाखांच्या घरात आहे. या अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन येत्या ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.

Story img Loader