‘हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत’, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्याची गरज असल्याचे गाझियाबादमधील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
लव्ह जिहादमागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य आणि ऑर्गनायझरमधून मांडण्यात आला आहे. रांचीमधील राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचं प्रकरण उजेडात आल्यानंतर आता विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याविषयी बोलताना भागवत यांनी हे मत व्यक्त केले आहे.
राजकीय फायद्यासाठी लव्ह जिहादच्या मुद्द्याला जाणून-बुजून आरएसएसकडून हवा दिली जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teach girls meaning of love jihad says rss chief