Teacher Arrested : पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली आहे. तिने विद्यार्थ्याच्या वडिलांशी अफेअर करत लाखोंची खंडणी उकळली असा आरोप तिच्यावर आहे. तसंच तिच्यावर ब्लॅकमेलिंगचाही आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अखेर श्रीदेवी रुदागी नावाच्या शिक्षिकेला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
नेमकी ही घटना कुठे घडली?
बंगळुरु या ठिकाणची ही घटना आहे. या प्रकरणात पोलिसांनी श्रीदेवी रुदागी नावाच्या शिक्षिकेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी रुदागीसह गणेश काळे आणि सागर या तिच्या दोन साथीदारांना चार लाख रुपये उकळल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. श्रीदेवी रुदागी तिच्या विद्यार्थ्याच्या वडिलांना फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत होती. तिने २० लाख रुपयांची मागणी केली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार एक व्यापारी बंगळुरुतल्या पश्चिम भागात त्याच्या पत्नीसह आणि तीन मुलींसह राहात होता. त्याने २०२३ मध्ये त्याच्या पाच वर्षांच्या मुलीचा प्रवेश एका शाळेत घेतला होता. या प्रवेशाच्या वेळी या व्यापाऱ्याची भेट श्रीदेवी रुदागीसह झाली. त्यानंतर श्रीदेवी रुदागी सातत्याने या व्यापाऱ्याच्या संपर्कात राहू लागली. वेगवेगळ्या फोनवरुन या व्यापाऱ्याशी संपर्क साधू लागली, व्हिडीओ कॉल करु लागली. यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांची जवळीक वाढली तेव्हा श्रीदेवीने या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये उकळले. त्यानंतर जानेवारी महिन्यात १५ लाख रुपयांची मागणी केली.
५० हजार उधार घेण्याच्या बहाण्याने गाठलं व्यापाऱ्याचं घर
व्यापाऱ्याने सुरुवातीला पैसे दिले. पण १५ लाखांची रक्कम देण्यास तो नकार देऊ लागला. यानंतर श्रीदेवीने ५० हजार उधार हवेत असा बहाणा करत या व्यापाऱ्याचं घर गाठलं. इकडे या व्यापाराला मंदीला सामोरं जावं लागलं तेव्हा त्याने विचार केला की कुटुंबाला घेऊन आपण गुजरातला जाऊ. गुजरातला जायचं असेल तर मुलीचं ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल, यासाठी सदरचा व्यापारी शाळेत गेला. तिथे श्रीदेवी रुदागी, गणेश काळे आणि सागर हे तिघेही होते. या सगळ्यांनी या व्यापाऱ्याला श्रीदेवीसह असलेले फोटो आणि व्हिडीओ दाखवले आणि ब्लॅकमेल करत २० लाख रुपयांची मागणी केली. २० लाख रुपये दिले नाहीस तर तुझ्या कुटुंबाला तुझे हे फोटो आम्ही दाखवू अशी धमकीही दिली.
श्रीदेवीच्या मागण्या वाढतच गेल्या
या व्यापाऱ्याने मग या तिघांनाही सगळी परिस्थिती सांगितली. तरीही हे तिघे ऐकेनात, शेवटी १५ लाख रुपये द्यायचे आणि प्रकरण मिटवायचं असं ठरलं. त्यापैकी १ लाख ९० हजार रुपये आधी देण्यात आले. मात्र नंतर श्रीदेवीच्या मागण्या वाढतच गेल्या. १७ मार्च २०२५ ला श्रीदेवीने सदर व्यापाऱ्याला फोन केला आणि सांगिलं की मला ५ लाख रुपये माजी पोलीस अधिकाऱ्याला एक लाख प्रत्येकी गणेश काळे आणि सागरला तर ८ लाख रुपये माझे असे पैसे पाठवून दे. यानंतर शेवटी व्यापाऱ्याने पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी या प्रकरणात मग श्रीदेवीसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.