Kendriya Vidyalaya Teacher dies by suicide Crime News : दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातील एका ३१ वर्षीय महिला शिक्षिकेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गाजियाबादच्या वसुंधरा येथे आपल्या राहत्या घरात या शिक्षिकेने आपले जीवन संपवले. यानंतर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरा यांना सोमवारी अटक केली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी हुंडा घेतल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे.

मृत्यूच्या काही मिनीटांपूर्वी अन्विता शर्मा यांनी त्यांचा भाऊ अमित याला रविवारी मेसेज केला होता. अमित यांनी सांगितलं की, “तिने रविवारी दुपारी १.३० वाजता चिठ्ठी (सुसाईड नोट) आणि एक मेसेज पाठवला आणि त्यानंतर मी तिच्या पतीला माहिती दिली.” अन्विता यांचा शेवटचा मेसेज होता की, “आय लव्ह यू भाई. प्लीज मला माफ कर आणि सर्वांची काळजी घे.”

मृत शिक्षिकेच्या भावाने सांगितले की अन्विताचे गौरव कौशिक याच्याशी २०१९ साली लग्न झाल्याच्या महिनाभरानंतर, तिला तिच्या नात्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यांच्यात सतत भांडणे होत. “आम्ही अन्विताला घटस्फोटाचा विचार करण्यास सांगितले पण कौशिकने तिला परत येण्यास राजी केले,” असा दावा त्याने केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली जेव्हा महिलेचा पती जो की एक डॉक्टर आहे आणि तिचा ४ वर्षांचा मुलगा घरात नव्हते. गाजियाबादच्या इंद्रपूरमचे एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की पोलिसांना घटनास्थळावरून दीड पानाची सुसाईड नोट मिळाली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय

महिला शिक्षिकेने आपल्या सुसाईड नोटमध्ये पतीच्या वर्तनाबद्दल तक्रार केली आहे. “माफ करा, मी आता हे सहन करू शकत नाही, म्हणून मी हे जग सोडून जात आहे. माझ्या पतीला एक सुंदर मुलगी हवी होती जी घरातील सर्व कामे करू शकेल आणि पैसेही कमवू शकेल. मी माझ्या परीने सर्वकाही केले पण या माणसाला नेहमीच चुका सापडत होत्या.”

“प्रत्येक वादात, तो मला आणि माझ्या कुटुंबाला टोमणे मारायचा… की तो आमच्या सर्वांपेक्षा जास्त पैसे कमवतो… लग्नानंतर त्याने मला पुढे शिक्षण घेऊ दिसे नाही आणि त्याच्याकडे माझ्या सर्व खात्यांचा एक्सेस होता. त्याने माझ्या नोकरीशी लग्न केलं, माझ्याशी नाही…” असेही सुसाईड नोटमध्ये महिलेने लिहिले.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अन्विताचे वडील अनिल शर्मा यांनी सांगितेल की त्यांनी लग्नावर जवळपास २६ लाख रुपये खर्च केले. “मला जाणवलं की कुटुंब (कौशिकचे) लोभी होते. जेव्हा ते पहिल्यांदा माझ्या मुलीला भेटण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी वाहनाची मागणी केली होती. मला संकोच वाटत होता पण नंतर मी माझ्या मुलीला भेट देण्याचा विचार केला. पण ते वाहनही कौशीक याच्या नावावर होते.”

एसीपी श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांनी महिलेचा तिच्या पती, त्याचे वडील सुरेंद्र शर्मा आणि आई मंजू यांच्या विरोधात बीएनएस कलम ८५, ८० (२),११५ (२), ३५२ आणि हुंडाविरोधी कायदा, १९६१ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे .

Story img Loader