रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे. हे शिकवणाऱ्या आणि मोदींबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. भाजपा आमदारांनी या शिक्षिकेवर आरोप केला की त्यांनी रामायण आणि महाभारत हे काल्पनिक असल्याचं विद्यार्थ्यांना शिकवलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. तसंच शिक्षिकेने हे शिकवल्यानंतर त्याविरोधात दक्षिणपंथीय समूहाने आंदोलन केलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर शाळेने शिक्षिकेला निलंबित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे घडली ही घटना?

बंगळुरु येथील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी शाळेत ही घटना घडली आहे. या शाळेतल्या शिक्षिकेविरोधात असाही आरोप आहे की २००२ च्या गोध्रा दंगलींचा उल्लेख करत आणि बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख करत या शिक्षिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्यं केली. या शिक्षिकेने लहान मुलांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही या शिक्षिकेविरोधात आंदोलन करत आहोत असं दक्षिण पंथीय समूहाने सांगितलं. तसंच आम्हाला आता भाजपाची साथ लाभली आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. ज्यानंतर या शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- अन्वयार्थ: ‘रामायणा’चे महाभारत

या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते आहे. शाळेने या शिक्षिकेने जे वक्तव्य केल्याचा आरोप केलाय त्यावरुन शिक्षिकेला निलंबित केलं आहे. शाळेने असंही म्हटलं आहे की सेंट गेरोसा शाळेच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेमुळे मात्र एक प्रकारचा अविश्वास समाजात निर्माण झाला आहे. आम्ही पुन्हा एकदा नव्याने समाजात आमच्याबाबतचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसंच सगळ्यांच्या भल्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने काम करु असं शाळेने म्हटलं आहे. टाइम्स नाऊने या विषयीचं वृत्त दिलं आहे.