उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले. विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत आरोपी शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांविषयी द्वेष निर्माण करताना दिसत आहे. तसेच मुस्लीम धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचंही समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार गुरुवारी (२४ ऑगस्ट) मनसुरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुब्बारपूर गावातील शाळेत घडला.

आरोपी शिक्षिका एका शाळेची मालक

आरोपी शिक्षिकेचं नाव त्रिप्ता त्यागी असं आहे. पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग आरोपी शिक्षिका आणि तिच्या मालकीच्या नेहा पब्लिक स्कुल या शाळेविरोधात कारवाईबाबत चाचपणी करत आहे.

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावं. शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या तोंडावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असं काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुलं उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.

हेही वाचा : शेजारच्या मुलीवर प्रेम केलं अन् आई-वडिलांना मुकला, शेजाऱ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करत घेतला जीव

“चला मारण्याचं आणखी कोण बाकी आहे”

यानंतर शिक्षिका म्हणाली की, चला मारण्याचं आणखी कोण बाकी आहे. आता पाठिवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचं लाल होत आहे. त्यामुळे तोंडावर मारू नका. सर्वांनी पाठिवर मारा.

दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यासाठी आरोपी शिक्षिका उपलब्ध होऊ शकलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher order students to beat muslim student in uttar pradesh video viral pbs
Show comments