२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने जागतिक विक्रम केला. भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश ठरला. पण चांद्रयान-३ साठी लाँचर पॅडची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. यातील काही तंत्रज्ञांवर इडली, चहा आणि तर काहींवर मेमोज विकण्याची वेळ आली आहे.

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, रांची येथील Heavy Engineering Corporation Limited (HEC)ने मागील काही वर्षांत इस्रोसाठी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेलं लाँचर पॅडही याच कंपनीने निर्माण केल्याचा दावा केला जात आहे. पण या कंपनीच्या २८०० कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामुळे रांचीच्या धुर्वा येथील ‘हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ (HEC) चे कर्मचारी आंदोलन करत आहेत.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
Aamir Khan Karisma Kapoor Raja Hindustani kiss
“तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

पगार न मिळाल्याने अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आहे. एचईसीचे तंत्रज्ञ दीपक कुमार उपरारिया हे गेल्या काही दिवसांपासून इडली विकत आहेत. रांचीच्या धुर्वा भागातील जुन्या विधानभवनासमोर त्यांचं दुकान आहे. ते दररोज सकाळी इडली विकतात आणि दुपारी ऑफिसला जातात. पुन्हा संध्याकाळी ते इडली विकतात आणि मग घरी जातात.

हेही वाचा-चांद्रयाननंतर आता समुद्रयान मोहीम; समुद्राचा तळ गाठणारा ‘मत्स्य ६०००’ प्रकल्प काय आहे?

‘बीबीसी’शी बोलताना दीपक यांनी सांगितलं, “सुरुवातीच्या काळात मी क्रेडिट कार्डचा वापर करत माझं घर सांभाळलं. पण यामुळे माझ्यावर २ लाखांचं कर्ज झालं. कर्जाची परतफेड करता न आल्याने बँकेनं मला ‘डिफॉल्टर’ (कर्ज बुडवणारा) घोषित केलं. यानंतर मी नातेवाईकांकडून पैसे घेऊन घर चालवू लागलो. आतापर्यंत मी चार लाखांचं कर्ज घेतलं आहे. मी कोणाचेच पैसे परत न केल्याने त्यांनी मला पैसे देणं बंद केलं. यानंतर मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि काही दिवस घर चालवलं.”

आपली व्यथा सांगताना दीपक पुढे म्हणाले, “जेव्हा माझं कुटुंब उपाशी मरेन, असं मला वाटलं. तेव्हा मी इडलीचं दुकान सुरू केलं. माझी पत्नी चांगली इडली बनवते. मी दररोज ३०० ते ४०० रुपयांची इडली विकतो. यातून मला कधी ५० तर कधी १०० रुपयांचा नफा होतो. सध्या इडली विकूनच मी माझं घर चालवत आहे.”

एचईसीच्या कर्मचाऱ्यांनी चांद्रयान-३ च्या लाँचर पॅड निर्मितीचा दावा केला असला तरी केंद्र सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. एचईसीनने अधिकृतपणे चांद्रयान-३ साठी कोणतीही उपकरणं बनवली नाहीत, असं केंद्राने म्हटलं आहे. पण २००३ ते २०१० या कालावधीत HEC ने इस्रोला मोबाईल लॉन्चिंग पेडेस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, EOT क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोझिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझॉन्टल स्लाइडिंग दरवाजांचा पुरवठा केला होता, हे केंद्राने मान्य केलं आहे.

हेही वाचा- Chandrayaan 3: ‘विक्रम’ सध्या काय करतोय? चांद्रयान २ च्या ऑर्बिटरमधून टिपलेले फोटो दाखवत इस्रोची माहिती

सरकारच्या या दाव्यावर HEC मध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या पुरेंदू दत्त मिश्रा यांनी सांगितलं, “तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारचं म्हणणं योग्य असू शकतं. कारण HEC ने चांद्रयान-३ साठी वेगळे लॉन्चपॅड बनवले नाहीत. पण दुसरं सत्य हे आहे की, भारतात आमच्याशिवाय दुसरी कोणतीही कंपनी लॉन्चपॅड बनवत नाही.”

HEC ने चांद्रयान-३ साठी ८१० टनांच्या लाँचपॅड व्यतिरिक्त फोल्डिंग प्लॅटफॉर्म, WBS, स्लाइडिंग दरवाजाही बनवला आहे. तसेच, HEC सध्या इस्रोसाठी आणखी एक लॉन्चपॅड तयार करत आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी एचईसीचे दोन अभियंतेही संबंधित उपकरणं बसवण्यासाठी गेले होते, असंही मिश्रा यांनी सांगितलं.