Teen kills fathers lover : आपल्या वडिलांचे एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे कळाल्यानंतर अल्पवयीन मुलाने, कोलकात्याच्या ईएम बायपास येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवरजवळ, तरुणीवर चाकू हल्ला करून तिची हत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या हल्ल्यातील पीडिता एका आयटी फर्ममध्ये काम करायची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, ईएम बायपास ढाबा प्रगती मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर तिला एनआरएस रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान अल्पवयीन हल्लेखोर आणि तिच्या आईला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सील लेनमधील एक व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाला त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल कळले होते. त्यानंतर त्यांनी जीपीएस वापरून त्याची गाडी ट्रॅक केली होती. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

हल्लेखोराचा बाप अजूनही बेपत्ता

हल्ल्यापूर्वी, या प्रकरणातील व्यक्ती त्याचे कुटुंबीय घटनास्थळी येत असल्याचे पाहिल्यानंतर तेथून पळून गेला होता. तो अजूनही बेपत्ता आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी मध्य कोलकाता येथे राहणाऱ्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्या ३४ वर्षीय आई आणि २२ वर्षीय चुलत भावालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस मुलाच्या वडिलांचा आणि आरोपी ज्या कारमधून घटास्थळी पोहोचला त्या कारच्या चालकाचा शोध घेत आहेत.

बापाला शोधण्यासाठी जीपीएस ट्रॅकरची मदत

“अल्पवयीन मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील आणि पीडित मुलगी एका कारमधून निघाले होते. त्यानंतर मुलगा, त्याची आई, चुलत भाऊ आणि ड्रायव्हर या चार जणांनी दुसऱ्या कारने त्यांचा पाठलाग सुरू केला. यासाठी अल्पवयीन मुलाने त्याच्या वडिलांच्या कारमधील जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली आणि त्यांना शोधले. जेव्हा ते घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी वडिलांची गाडी पाहिली व खाली उतरले. त्यानंतर त्याने वडिलांना आणि पीडितेला एका चहाच्या टपरीजवळ पाहिले. आपला मुलगा येत असल्याचे पाहिल्यानंतर वडील तेथून पळून गेले. त्यानंतर मुलाने पीडितेच्या मानेवर चाकूने वार केले”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.