गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी एका मोठा कट रचण्यात आला होता. हा कट काँग्रेचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता, असा दावा अहमदाबाद पोलिसांनी गुजरात दंगल प्रकरणात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच या कटात तीस्ता सेटलवाड यांचा देखील समावेश होता, असा आरोपही गुजरात पोलिसांकडून करण्यात आला आहे.

गुजरात पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र दाखल

२००२ च्या गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार बरखास्त करण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून एक मोठा कट रचण्यात आला होता. तीस्ता सेटलवाड देखील या कटात सहभागी होत्या, असे प्रतिज्ञापत्र गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सत्र न्यायालयात दाखल केले आहे.

हा कट रचताना सेटलवाड यांचा उद्देश निवडून आलेले सरकार बरखास्त करणे किंवा अस्थिर करणे हा होता. त्यासाठी त्यांनी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या प्रयत्न केला. यासाठी त्यांना राजकीय पक्षाकडून आर्थिक मदतही मिळाली, असेही एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – २००६ औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत दिला जामीन

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून, सेटलवाड यांना २००२ मध्ये गोध्रा नंतरच्या दंगलीनंतर ३० लाख मिळाले. तसचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे या प्रकरणात गोवण्यासाठी दिल्लीत दोघांच्या बैठकीदेखील होत होत्या, असा दावाही एसआयटीने केला आहे.

२००२ च्या गुजरात दंगल प्रकरणी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या आरोपाखाली अहमदाबाद गुन्हे शाखेने दोन व्यक्तींना अटक केली होती. यामध्ये सेटलवाड यांचाही समावेश होता.

हेही वाचा – “कुठंतरी पाणी मुरतंय…नक्कीच काहीतरी गडबड आहे” – अजित पवारांची सूचक टिपणी

Story img Loader