सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरूण तेजपाल यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या रविवारी न्यायालयाने तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत शनिवारी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. चौकशीसाठी तेजपाल यांच्या कोठडीत आणखी वाढ करून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागमी मान्य करत तेजपाल यांची कोठडी आणखी चार दिवसांनी वाढवून दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी तेहलकाच्या माजी व्यवस्थापकिय संपादिका शोमा चौधऱी यांची साक्ष नोंदवण्यात आली. शुक्रवारी गोव्यात आलेल्या शोमा चौधरींनी शनिवारी सकाळी पणजी सत्र न्यायाधीशांपुढे हजर राहून आपली साक्ष नोंदवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case goa court extends tarun tejpals police remand by four days