सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गोत्यात आलेले तहलकाचे संपादक तरुण तेजपाल शुक्रवारी गोव्यात पोलिसांसमोर हजर झाले. मात्र, येथील सत्र न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल करून शनिवापर्यंत अटक टाळली. बलात्कारविरोधी कायदा कठोर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तेजपाल शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत गोव्यात उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचे उशिरा येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पत्नी गीता बात्रा, इतर कुटुंबीय व वकील होते. विमानतळावर उतरताच तेजपाल येथील गोवा पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. तेजपाल यांच्यावतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकील गीता लुथरा यांनी विद्यमान बलात्कार कायद्याबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘तेजपाल यांच्यावरील आरोपासंदर्भात राजकीय हेतूने प्रेरित होऊन तपास करण्यात आला. त्यांच्यावर आरोप करणारी तरुणी मानसिकदृष्टय़ा अस्थिर आहे. बलात्कारासंदर्भातील कायदाच कठोर आहे’. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारने बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करून तो अधिकाधिक कठोर केला असल्याचे लुथरा यांचे म्हणणे होते.
बलात्काराचा कायदा फारच कठोर
सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गोत्यात आलेले तहलकाचे संपादक तरुण तेजपाल शुक्रवारी गोव्यात पोलिसांसमोर हजर झाले.
First published on: 30-11-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case new rape law is draconian says tarun tejpals lawyer