तहलका’तील पीडित महिला पत्रकाराला चारित्र्यहननाची भीती दाखवल्याच्या आरोपांचे व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांनी बुधवारी खंडन केले. ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर कंपनीतील महिला पत्रकाराने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिला पत्रकारावर झालेल्या अन्यायात सहभाग असल्याचा आरोपही चौधरी यांनी फेटाळून लावला.
त्या म्हणाल्या, पीडित महिलेवर झालेल्या अन्यायात तिला चारित्र्यहननावरून घाबरवण्यात माझा सहभाग असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. हे वृत्त निराधार आणि तथ्यहिन आहे. हा प्रकार म्हणजे आपल्याविरुद्ध घृणास्पद मोहिम चालविण्याचे काम असल्याचे दिसून येते.
पीडित महिलेने कंपनीच्या व्यवस्थापनाला पाठविलेल्या राजीनामापत्रात तेजपाल आणि चौधरी यांनी आपल्यावर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. चारित्र्यहननाची भीती दाखवून माझ्यावर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचे पीडितेने पत्रात म्हटले आहे.

Story img Loader