सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचासाप्रकरणी पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेले तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची काल (रविवारी) तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आल्यानंतर.  आज (सोमवार) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तरुण तेजपाल यांची पुरूषार्थ चाचणी करण्यात आली. अशा प्रकरणांत ही चाचणी करणे आवश्यक असल्याचे, पोलिसांचे म्हणणे आहे.
तेजपाल अडकले!
तरुण तेजपाल यांची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता असून, गोव्यातील त्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये म्हणजेच घटनास्थळी ओळख परेड आणि घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेण्यासाठी तेजपाल यांना नेण्यात येऊ शकते.
गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांचे जाबजबाब सुरू केले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शमा जोशी यांनी तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, मात्र पोलिसांनी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
तेहलका बुडणार?
सरकारी वकील फ्रान्सिस तवेरा यांनी सांगितले, की तेजपाल यांनी केलेला गुन्हा पाहता त्यांचे जाबजबाब घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची गरज आहे. तेजपाल यांना शनिवारी रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी फेटाळून लावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा