‘तहलका’तील पीडित पत्रकार महिलेने तरुण तेजपाल आणि शोमा चौधरी यांच्याशी मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचे ‘रेकॉर्डिंग’ करून ठेवले आहे. नोव्हेंबरमध्ये गोव्यात संबंधित पत्रकार महिलेवर तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर तिच्याशी तेजपाल आणि ‘तहलका’च्या माजी व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचे सर्व रेकॉर्डिंग तिने गोवा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. गोवा पोलीसांनीच ही माहिती तेथील न्यायालयात दिली.
लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपामुळे गोव्यातील न्यायालयाने तेजपाल यांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पोलीसांनी तेजपाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली होती. हा गुन्हा अतिशय गंभीर असून, आम्हाला आरोपीविरोधात आणखी पुरावे गोळा करायचे आहेत. त्यामुळे तेजपाल यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, न्यायालयाने तेजपाल यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संबंधित घटनेनंतर तेजपाल, शोमा चौधरी यांनी पीडित महिलेला पाठविलेल्या ई-मेल्सची प्रतही गोवा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. पीडित महिलेने मोबाईलवरील संभाषणाचे केलेले रेकॉर्डिंग आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण याचा या प्रकरणामध्ये पुरावे म्हणून वापर करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Story img Loader