‘तहलका’चे संस्थापकीय संपादक तरुण तेजपाल याच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. तेजपाल याच्यावर महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून १ जुलै रोजी त्याच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
न्या. विक्रमजीत सेन आणि न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या पीठाने अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली. गोवा सरकारने या अंतरिम जामीन मुदतवाढीला विरोध केला.या प्रकरणातील पीडित महिला आणि तिचा मित्र यांना धमकी देणारे ई-मेल येत असल्याचे गोवा सरकारच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले. तथापि, तेजपाल याच्या नियमित जामीन अर्जावर तीन दिवसांनी सुनावणी होणार असल्याचे कारण देत पीठाने अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली.
केरळमध्ये

Story img Loader