सहाकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असलेल्या तरुण तेजपाल यांची आज (बुधवार) सकाळी पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
तेजपाल यांची वैद्यकीय चाचणी सकारात्मक
तेजपाल यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाडून कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासादरम्यान, आपल्याला काही आठवत नसल्याचे तेजपाल यांनी म्हटल्यानंतर त्यांना मनोरुग्णालयात पाठवून तपासणी करण्यात आली आहे. मनोरुग्णालयातील वैद्यकीय तपासणीच्या वेळी तेजपाल यांना कोणताच मानसिक धक्का बसला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी हे प्रकरण सर्वप्रथम उघड झाल्यानंतर तेजपाल यांना ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला तेथे नेऊन घटनेचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर नियमांनुसार तेजपाल यांची पुरुषत्व चाचणी करण्यात आली. ही चाचणी सकारात्मक निघाली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
अग्रलेख- करुण निस्तेजपाल
तेजपालांची ज्याठिकाणी चौकशी सुरू आहे. त्या पणजी मुख्यालयाच्या कोठडीत भयंकर उकाडा असल्याची तक्रार तेजपालांनी केली होती. कोठडीत पंखा लावावा अशीही मागणी तेजपाल यांनी केल्यानंतर यासंबंधीचे विनंती पत्र पणजीच्या सत्र न्यायालयात तेजपालांच्या वकिलाने सादर केले होते. या विनंती पत्रावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे तपास पथक तेजपाल यांच्याशी कसून चौकशी करत असून प्रकरण निकालात काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
बलात्काराचा कायदा फारच कठोर- तरुण तेजपाल

Story img Loader