‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना देण्यात आलेल्या अंतरिम जामीनाच्या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २७ जूनपर्यंत वाढ केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
सहकारी महिलेवर बलात्काराचा आरोप असलेल्या तेजपाल यांना आईच्या निधनामुळे अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. अंत्यसंस्कार आणि इतर विधींसाठी त्यांना सुरुवातीला तीन आठवड्यांचा जामीन देण्यात आला होता. मंगळवारी त्यामध्ये वाढ करण्यात आली. न्या. जे. एस. खेहर आणि न्या. सी. नागाप्पन यांनी तेजपाल यांना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर तेजपाल यांच्यावरील आरोपांप्रकरणी तपास पूर्ण झालेला असताना त्यांना तुरुंगात ठेवण्याची मागणी गोवा पोलीस का करीत आहेत, याचा खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तेजपाल यांच्या वकिलांनी अंतरिम जामीनाची मुदत सहा आठवड्यांनी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामीनाची मुदत वाढविण्याचा निर्णय दिला.

Story img Loader