सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेले तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी ‘ते’ कृत्य हे संमतीनेच झाल्याचे म्हटले आहे.
तेहलका बुडणार?
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू असून तेजपाल यांची सविस्तर चौकशी सुरू आहे. तेजपाल आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. या प्रकरणाच्या तपासाधिकारी सुनीता सावंत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून तेजपाल यांचे निवेन नोंदविण्यात आले आहे. तेजपाल यांनी हे प्रकरण घडल्याचे मान्य केले असून हे कृत्य परस्परसंमतीनेच घडल्याचा दावा केला आहे. असे तपास करणाऱया गुन्हे शाखेच्या पथकामधील ज्येष्ठ अधिकाऱयाने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
तेजपाल यांची वैद्यकीय चाचणी सकारात्मक
अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर तेजपाल सध्या गोवा गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहेत. यात तेजपाल यांच्या वैद्यकीय चाचण्याही आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. तसेच प्रकरणाची कसून चौकशीही करण्यात येत आहे. त्याचबरोबर तेहलकाच्या माजी व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर तिघांना काल (बुधवार) चौकशीसाठीचे समन्स जारी करण्यात आले आहेत.
तेजपालांची पुन्हा वैद्यकीय चाचणी

Story img Loader