गेल्या महिन्याभरात बिहारच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. महिन्याभरापूर्वी भाजपा व मोदींविरोधातील विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी जोरकसपणे प्रयत्न करणारे नितीश कुमार स्वत:च भाजपाप्रणीत एनडीए आघाडीत जाऊन बसले. बिहारमध्ये सत्तापालट झाला आणि राजदला दूर लोटून भाजपासोबत नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केलं. यानंतर सोमवारी नितीश कुमार यांच्या बहुमत चाचणीवर बिहार विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान राजद आमदार व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तुफान टोलेबाजी केली.

“मी नितीश कुमारांचा आदर करतो, करत राहीन”

नितीश कुमार यांना चिमटे काढताना तेजस्वी यादव यांनी आपण त्यांचा कायम आदर करत राहू, असं विधान केलं. “मुख्यमंत्री कायम हेच म्हणत राहिले की मी त्यांच्या मुलासारखा आहे. मीही त्यांना माझा पालक मानतो. तुम्ही प्रभू श्रीरामाची चर्चा करता. आपल्या सगळ्यांच्या मनात राम आहेतच. पण जसे प्रभू श्रीरामाचे वडील दशरथ होते तसेच आम्ही नितीश कुमार यांना आमचे पालक मानतो”, असं तेजस्वी यादव म्हणताच सभागृहात हशा पिकला!

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

“नितीश कुमार दशरथ, पण आम्हाला वनवास नाही”

“अनेकदा नितीश कुमार म्हणालेत की ‘आता तर हाच सगळं करेल, हाच सगळं पुढे नेईल’. तरुणच पुढे जाणार ना? पण हेही खरंय की अनेकदा यांचे काही नाईलाज झाले असतील. जसे राजा दशरथाचे झाले होते, ज्यामुळे त्यांनी प्रभू श्रीराम यांना वनवासाला पाठवलं. पण आम्ही असं मानतो की आम्ही वनवासाला आलेलो नाही. नितीश कुमार यांनी आम्हाला जनतेमध्ये जनतेचं सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी पाठवलं आहे”, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका

“आधी आमचे खटले ऐकवले, नंतर भाजपाची फसवणूक”

दरम्यान, नितीश कुमार यांनी सातत्याने बाजू बदलल्याचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी वेळोवेळी दिलेली कारणं तेजस्वी यादव यांनी सभागृहात सांगितली. “आधी जेव्हा त्यांनी आम्हाला दूर लोटलं, तेव्हा त्यांचा काय नाईलाज होता हे मला माहिती नाही. कुणालाच माहिती नाही. पण तेव्हा ते एकच म्हणाले की तुमच्यावर खटले आहेत. मग जेव्हा त्यांनी आम्हाला जवळ केलं तेव्हा म्हणाले की भाजपावाले फसवतात. ईडी-सीबीआय मागे लावण्याचं काम करतात. मी त्यांना मान देतोच. पण बिहारच्या जनतेला हे जाणून घ्यायचंय की असं काय कारण आहे ज्यासाठी तुम्ही कधी इथे तर कधी तिथे असता?”, असा खोचक सवालही तेजस्वी यादव यांनी केला.

“२०२० मध्ये तुम्ही एनडीए सोडलं तेव्हा एवढंच म्हणाले की भाजपा आमचा पक्ष तोडत आहे. पक्ष सोडण्यासाठी आमच्या आमदारांना प्रलोभनं दिली जात आहेत. तुम्ही म्हणाले होते की तुम्हाला पंतप्रधान वगैरे काहीही व्हायचं नाहीये. देशभरातल्या विरोधकांना एकत्र करून हुकुमशाहाला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचं नाही असंच तुम्ही म्हणाले होते. पण काल तुम्ही राज्यपाल भवनातून बाहेर आलात, तेव्हा म्हणालात की तुमचं आघाडीच मन लागत नाही. आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी नाचगाणं करण्यासाठी होतो का?” असाही प्रश्न यादव यांनी उपस्थित केला.