गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात सहकारी पत्रकार महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. या अगोदर त्यांना सहा दिवसांची कोठडी दिली होती त्याची मुदत १० डिसेंबरला संपणार होती. तेजपाल यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही समजते.
दरम्यान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी क्षमा जोशी यांच्यासमोर आज पोलीस कोठडी वाढवण्यासाठी युक्तिवाद झाले. तेजपाल यांचे वकील संदीप कपूर यांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केला. आपल्या अशिलाचे कसून जाबजबाब घेतले असून त्या घटनेच्या वेळी त्यांनी घातलेल्या कपडय़ांसह चीजवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सरकारी वकील सुरेश लोटलीकर यांनी सांगितले की, अजून काही साक्षीदार तपासायचे असून त्यामुळे कोठडी वाढवावी. दरम्यान तहलका नियतकालिकातील या पीडित महिलेच्या तीन सहकाऱ्यांचे जाबजबाब शुक्रवारी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर झाले. तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा