ऑस्ट्रेलियातून आणलेले चॉकलेट खाताना ते घशात अडकल्याने एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेलंगणाच्या वारंगल येथे घडली आहे. संदीप सिंग असं या मुलाचे नाव आहे. संदीप हा तिसऱ्या वर्गात शिकत असून शाळेच्या गेटपासून वर्गाच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
हेही वाचा – बापरे! इथे माणसांची नाही, चक्क सापांची दुनिया, ‘Snake Island’वर फिरतायेत जगातील सर्वात विषारी साप
टाईम्स ऑफ इडियांने दिलेल्या वृत्तानुसार, संदीपचे कंगाहन सिंग यांनी त्याला पहाटे शाळेच्या गेटसमोर सोडले होते. त्यानंतर संदीप चालत वर्गाकडे जात असताना त्याने खिशातले चॉकलेट काढून खालले. मात्र, तो वर्गात पोहोचणार तेवढ्यात तो खाली कोसळला. तिथे उपस्थित असलेल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्यध्यापकांसह संदीपच्या वडिलांना दिली. तसेच संदीपला एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या घशात अडकलेले चॉकलेट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीपचा जीव गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा – VIP नंबरप्लेट असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत ५० वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू; टायर फुटल्याने झाला अपघात
कंगाहन सिंग यांना तीन मुलं असून ते नुकताच ऑस्ट्रेलियातून परतले होते. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियातून आपल्या मुलांसाठी काही चॉकलेट आणले. दरम्यान, शनिवारी सकाळी संदिपच्या आईने हे चॉकलेट आपल्या मुलांना दिले होते. मात्र, हे चॉकलेट संदीपच्या घशात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.