आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने तेलंगण राष्ट्र समितीची प्रदीर्घ कालावधीपासूनची मागणी मान्य करत स्वतंत्र तेलंगणनिर्मितीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, आता या विभाजनामुळे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत. भौगोलिकदृष्टय़ा आंध्र आणि तेलंगण ही दोन राज्ये विलग होणार असली तरी आंध्रच्या राजकारणावर पगडा असलेल्या विविध राजकीय पक्षांना पुन्हा एकदा राजकीय सारिपाटावर आपले बलाबल तपासून घ्यावे लागणार आहे. त्याचा हा आढावा..
काँग्रेस : तेलंगणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा मोठा राजकीय फायदा आपल्याला मिळेल हे गणित मांडून काँग्रेसने राज्यनिर्मितीचा हा डाव मांडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणची मागणी लावून धरणारा तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) हा पक्ष आपल्याशी आघाडी करेल असा काँग्रेसधुरीणांचा होरा आहे. मात्र, टीआरएसने तसे न केल्यास काँग्रेसचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसशी आघाडी करण्याचे टीआरएसने अद्याप तरी संकेत दिलेले नाहीत.
तेलुगु देसम पक्ष : तेलंगणनिर्मितीला पाठिंबा दर्शवून तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) तेलंगणवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. टीडीपीचा जोर रायलसीमा-आंध्र यांच्या सीमेवरच जास्त आहे. मात्र, हाच घटक या पक्षासाठी घातक ठरू शकतो. कारण स्वतंत्र तेलंगणच्या लाटेत कदाचित टीडीपी या भागात भुईसपाट होऊ शकतो. त्यामुळे या भागातील प्राबल्य टिकवण्यासाठी टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंना कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे.
वायएसआर काँग्रेस : telangana and power politics
seprete telangana, telangana,
तेलंगण आणि सत्तेचा सारिपाट
स्वतंत्र राज्यात विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
पीटीआय, हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने तेलंगण राष्ट्र समितीची प्रदीर्घ कालावधीपासूनची मागणी मान्य करत स्वतंत्र तेलंगणनिर्मितीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, आता या विभाजनामुळे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत. भौगोलिकदृष्टय़ा आंध्र आणि तेलंगण ही दोन राज्ये विलग होणार असली तरी आंध्रच्या राजकारणावर पगडा असलेल्या विविध राजकीय पक्षांना पुन्हा एकदा राजकीय सारिपाटावर आपले बलाबल तपासून घ्यावे लागणार आहे. त्याचा हा आढावा..
काँग्रेस : तेलंगणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा मोठा राजकीय फायदा आपल्याला मिळेल हे गणित मांडून काँग्रेसने राज्यनिर्मितीचा हा डाव मांडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेलंगणची मागणी लावून धरणारा तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) हा पक्ष आपल्याशी आघाडी करेल असा काँग्रेसधुरीणांचा होरा आहे. मात्र, टीआरएसने तसे न केल्यास काँग्रेसचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसशी आघाडी करण्याचे टीआरएसने अद्याप तरी संकेत दिलेले नाहीत.
तेलुगु देसम पक्ष : तेलंगणनिर्मितीला पाठिंबा दर्शवून तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) तेलंगणवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. टीडीपीचा जोर रायलसीमा-आंध्र यांच्या सीमेवरच जास्त आहे. मात्र, हाच घटक या पक्षासाठी घातक ठरू शकतो. कारण स्वतंत्र तेलंगणच्या लाटेत कदाचित टीडीपी या भागात भुईसपाट होऊ शकतो. त्यामुळे या भागातील प्राबल्य टिकवण्यासाठी टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंना कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे.
वायएसआर काँग्रेस : मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी सातत्याने काँग्रेसला त्रास देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. वायएसआर काँग्रेसची स्थापना करून त्यांनी सवतासुभा मांडला. मात्र, तेलंगणच्या मुद्दय़ावर जगनमोहन यांची भूमिका तळ्यातमळ्यात आशीच राहिली. अखेरच्या क्षणी त्यांनी अखंड आंध्रच्या बाजूने कौल दिला. शिवाय जगनमोहन सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे तेलंगणमधील वायएसआर काँग्रेसचे भविष्य अद्याप तरी अधांतरी आहे. तेलंगणमध्ये त्यांना मात्र फारसे महत्त्व नाही.
भाजप : गेल्या निवडणुकीत भाजपने तेलंगण पट्टय़ात काँग्रेसला धूळ चारली होती. तेलंगणनिर्मितीलाही भाजपने अनुकूलता दर्शवली होती. त्यामुळे भाजपला नव्या तेलंगण राज्यात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
भाकप : कम्युनिस्टांचा तेलंगण पट्टय़ात अद्याप तरी प्रभाव आहे. मात्र, त्याचा निवडणुकीत कितपत फायदा होईल याचे आडाखे आता बांधणे कठीण आहे. मात्र, भाकपने तेलंगणनिर्मितीला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो.
स्वतंत्र राज्यांसाठी कंठशोष
तेलंगणमुळे देशभरातील विविध राज्यांत अनेक संघटनांच्या आशा पल्लवित झाल्या असून गोरखालँडच्या निर्मितीसाठी गोरखालँड जनमुक्ती मोर्चा या संघटनेने चार दिवस बंद पुकारला आहे. दार्जिलिंग परिसरात हा बंद पाळला जाणार आहे. आसामात कार्बी अंगलाँग राज्याच्या निर्मितीची मागणी जोर धरू लागली असून गुरुवारी यासंदर्भातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. एका महाविद्यालयीन तरुणाचा या आंदोलनात मृत्यू झाला. आसामात काबी अंगलाँगसमर्थकांनी जोरदार आंदोलन सुरू केले असून आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमार करावा लागला आहे.
धुसफूस सुरूच
तेलंगणनिर्मितीवरून आंध्र प्रदेशात सुरू असलेली धुसफूस गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. रायलसीमा आणि किनारी भागात या निर्णयाविरोधात प्रचंड असंतोष असून आंदोलकांनी रास्ता रोको आणि दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला. कृष्णा, पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, कडप्पा आणि अनंतपूर या जिल्ह्य़ांना आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसला. अनंतपूरमध्ये तर अखंड आंध्रसमर्थकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.
नाराजीनामानाटय़ही जोशात
आंध्रच्या विभाजनाच्या निषेधार्थ बुधवारी किरणकुमार यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामे दिले होते तर सहा आमदारांनीही राजीनामास्त्र उपसले होते. गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. पायाभूत सोयीसुविधामंत्री गंता श्रीनिवास राव यांनी पदाचा राजीनामा दिला. रायलसीमा भागात सुरू असलेल्या असंतोषामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा