हैदराबाद : काँग्रेसच्या बाजूने तेलंगणमध्ये वादळ असून, सत्तारूढ भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव होईल असे भाकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्तवले आहे. खम्मम येथील पिनपका येथील सभेत राहुल गांधी यांनी भारत राष्ट्र समितीवर चौफेर टीका केली. तेलंगणमध्ये जनतेचे सरकार स्थापन करण्याचे काँग्रेसचे ध्येय असून, त्यानंतर केंद्रातील मोदी सरकार हटवण्याचे लक्ष्य असल्याचे राहुल यांनी नमूद केले.  तेलंगणमध्ये सत्तारूढ भारत राष्ट्र समिती कुठेच दिसत नाही. काँग्रेसने काय केले? असा सवाल मुख्यमंत्री के.सी.आर विचारत आहेत. मात्र तुम्ही ज्या शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिकलात त्याची स्थापना काँग्रेसने केली आहे असा टोला राहुल यांनी लगावला. ज्या रस्त्यांवरून प्रवास करता, ते काँग्रेसच्या काळातील आहेत. युवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेस तेलंगणचा विकास करेल असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> Chhattisgarh : ४० हजार कोटींची कर्जमाफी, मोफत वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा; राजकीय आश्वासनांचा तिजोरीवर भार

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका

तेलंगणसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सहा हमी

हैदराबाद: तेलंगणमध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यात चार हजार निवृत्तिवेतन, पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर याखेरीज विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटचे आश्वासन दिले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ४२ पानी जाहीरनाम्यात पक्षाने सहा हमी दिल्या आहेत.  त्यात सत्तेत आल्यास अडीच हजार प्रति महिना, २०० प्रति युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन आहे. विद्या भरोसा कार्डअंतर्गत विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यात शैक्षणिक शुल्क व इतर खर्चाचा समावेश आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कृषी कर्जे माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.