हैदराबाद : काँग्रेसच्या बाजूने तेलंगणमध्ये वादळ असून, सत्तारूढ भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव होईल असे भाकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वर्तवले आहे. खम्मम येथील पिनपका येथील सभेत राहुल गांधी यांनी भारत राष्ट्र समितीवर चौफेर टीका केली. तेलंगणमध्ये जनतेचे सरकार स्थापन करण्याचे काँग्रेसचे ध्येय असून, त्यानंतर केंद्रातील मोदी सरकार हटवण्याचे लक्ष्य असल्याचे राहुल यांनी नमूद केले. तेलंगणमध्ये सत्तारूढ भारत राष्ट्र समिती कुठेच दिसत नाही. काँग्रेसने काय केले? असा सवाल मुख्यमंत्री के.सी.आर विचारत आहेत. मात्र तुम्ही ज्या शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिकलात त्याची स्थापना काँग्रेसने केली आहे असा टोला राहुल यांनी लगावला. ज्या रस्त्यांवरून प्रवास करता, ते काँग्रेसच्या काळातील आहेत. युवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेस तेलंगणचा विकास करेल असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा