वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने हिरवा कंदील दिल्यानंतर पक्षाचे आंध्र प्रदेशातील नेते संतप्त झाले असून, शुक्रवारी पक्षाच्या सात खासदारांनी राजीनामे दिले.
गेल्या मंगळवारी यूपीएच्या समन्वय समितीने आणि कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला हिरवा कंदील दिल्यापासून अखंड आंध्र प्रदेशसाठी आंदोलनांना सुरुवात झालीये. आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी याआधीचे आपले राजीनामे दिले आहेत. त्याचबरोबर अखंड आंध्र प्रदेशचा पुरस्कार करणारे केंद्रातील कॉंग्रेसचे मंत्रीही शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
खासदार एल. राजगोपाल, ए. साईप्रताप, व्ही. अरूण कुमार, जी. व्ही. हर्षकुमार, अनंत व्यंकटराम रेड्डी आणि एस. पी. वाय. रेड्डी यांनी आपले राजीनामे लोकसभेच्या सचिवांकडे दिले आहेत. अजून काही खासदारही आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सब्बम हरी, एम. श्रीनिवासलू रेड्डी, रायापती संबाशिवा राव यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि किनारपट्टीच्या भागातून कॉंग्रेसचे एकूण १९ खासदार निवडून आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा