दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. दरम्यानच्या या काळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी राजीनामा दिला आहे. तामिळनाडू भाजपाच्या माजी प्रदेश अध्यक्ष राहिलेल्या सौंदरराजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यपालपदाचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेलंगणा राजभवनाने काढले निवेदन

तेलंगणा राजभवनाने निवेदनात म्हटले आहे की, “तेलंगणाचे नायब राज्यपाल डॉ.श्रीमती तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपला राजीनामा दिला आहे. हा राजीनामा भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे.”

हेही वाचा : निवडणूक रोख्यांबाबत लपवाछपवी नको, तीन दिवसांत सगळे तपशील द्या; सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला सुनावलं

सौंदरराजन यांनी सोमवारी सकाळी दिल्लीत राजीनामा सादर केल्यानंतर राजीनाम्याचे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले. सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारांच्या यादीत सौंदरराजन यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्या तामिळनाडूतील पाँडिचेरी उत्तर मतदारसंघ किंवा चेन्नईमधील दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान नागर समुदायातील सौंदरराजन यांनी २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु, डीएमकेच्या कनिमोळी यांच्याकडून थुथुकुडीमध्ये सौंदरराजन मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांनी तामिळनाडू विधानसभेची निवडणूकदेखील तीन वेळा लढवली. त्यांनी २००६ मध्ये राधापूरमधून, २०११ मध्ये वेलाचेरी आणि २०१६ मध्ये विरूगंपक्कमधून निव़डणूक लढवली होती. तीनही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.