IAS officer Smita Sabharwal : तेलंगणा सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) वरिष्ठ अधिकारी स्मिता सभरवाल आणि इतर २० अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबदल्या झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. कारण स्मिता यांनी नुकतेच हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील ४०० एकर जागेवरील झाडे सरकारने तोडल्यासंबंधीचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेला ‘घिबली’ फोटो सोशल मीडियावर रिपोस्ट केला होता. ज्याची चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोसंदर्भात पोलीसांकडून चौकशी देखील करण्यात आली आणि या चौकशीसाठी स्मिता यांना सायबराबाद पोलिसांसमोर हजर राहावे लागले होते.
या चौकशीनंतर सभरवाल यांनी सोशल मीडियावर सरकारला जाब विचारला आहे.. “या प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट २,००० लोकांनी पुन्हा शेअर केली. या सर्वांवर देखील अशीच कारवाई सुरू करण्यात आली आहे का याबद्दल मला स्पष्टीकरण हवे आहे! जर अले नसेल तर, यामुळे ठराविक लोकांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल चिंता निर्माण होते, जी नैसर्गिक न्याय आणि कायद्यासमोर सर्वजण समान असल्याच्या तत्त्वांशी तडजोड आहे,” असेही सभरवाल त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
दरम्यान आयएएस अधिकारी सभरवाल या यापूर्वी स्पेशल चीफ सेक्रेटरी फॉर युथ अडव्हांसमेंट, टुरिझम अँड कल्चर आणि डायरेक्टर ऑफ आर्कियोलॉजी म्हणून कार्यरत होत्या. सभरवाल यांना आता तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या
त्यांच्याबरोबरच सरकारने केलेल्या बदल्यांदरम्यान जयेश रंजन यांना विशेष मुख्य सचिव आयटीईअँडसी आणि क्रीडा विभाग येथून बदली करून मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष मुख्य सचिव आणि सीईओ ऑफ इंडस्ट्री अँड इनव्हेस्टमेंट सेल या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे YAT&C विभाग आणि डायरेक्टर ऑफ आर्कियोलॉजीचा कार्यभार देखील असेल.
तसेच संजय कुमार हे यापूर्वी एलईटीअँडएफ विभागात होते, त्यांची बदली होऊन ते आता इंडस्ट्री अँड कॉमर्स अँड आयटीईअँडसी आणि क्रीडा विभागात करण्यात आळी आहे.
तर डॉ. शशांक गोयल यांची बदली डायरेक्टर जनरल ऑफ डॉ. एमसीआर एचआरडी इंस्टिट्यूटमधून व्हाईस चेरमन ऑफ सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स येथे करण्यात आली आहे.तसेच त्यांना डीजी, ईपीटीआरआयची पूर्ण अतिरिक्त जबाबदारी देखील देण्यात येणार आहे.
एम दाना किशोर यांची मुख्य सचिव, एमएअँयूडी पदावरून बदली करून त्यांना मुख्य सचिव, एलईटीअँडएफ विभागात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे लेबर अँड एम्लॉयमेंट सर्व्हिसेसचा अतिरिक्त पदभार देखील असेल.
© IE Online Media Services (P) Ltd