Telangana School Attack : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या त्यानंतर संतप्त जमावाने शाळेवर हल्ला केला आहे. जमावाने शाळेत तोडफोड केली, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांना जबर मारहाणही केली. संतप्त जमाव शाळेत घुसून तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे, धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये वाद निर्माण करणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. मुख्याध्यापकाच्या कृतीमुळे संतापलेल्या पालकांनी मागणी केली की, शाळेने सर्वांची माफी मागावी.

NEET coaching centre assault | Teacher Beat Student Viral Video
कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर? शिक्षकाने काठी घेऊन विद्यार्थ्यांबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
A case has been filed against two people including the former working president of pune vidyarthi gruha Pune news
पुणे विद्यार्थी गृहाच्या माजी कार्याध्यक्षांसह दोघांविरुद्ध गुन्हा
Viral video of girls fighting in a class and a boy angrily hits the bench
“एकमेकींच्या जीवावरच उठतील”, भरवर्गात दोन मुलींचं भांडण सुरू असताना मुलाचा राग अनावर, पुढच्याच क्षणी त्याने जे काही केलं ते भयंकर
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
Hilarious School Days Video: students were dancing when teacher looked back watch what happen
याला म्हणतात शिक्षकांचा दरारा! बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच… Video एकदा पाहाच
sexual harassment
पुणे: शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा
Father daughter vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“एका बापाची घालमेल” लेकीची पाठवणी करताना वडील धायमोकलून रडले; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, हैदराबादपासून २५० किमी अंतरावर कन्नेपल्ली गावात ब्लेस्ड मदर तेरेसा नावाची मिशनरी शाळा आहे. मूळचे केरळचे रहिवासी असलेले जॅमन जोसेफ हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. जोसेफ यांनी बुधवारी शाळेत काही मुलांना शाळेच्या गणवेशाऐवजी इतर कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्यांना हे कपडे परिधान करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर विद्यार्थ्यांनी सांगितलं की, ते २१ दिवस हनुमान दीक्षेचं (२१ दिवसांचे उपवास) पालन करत आहे. यावर जोसेफ यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावलं.

हे ही वाचा >> पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल

दरम्यान, या शाळेने भगवे कपडे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याची बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले. मुख्याध्यापखांनी हिंदूंच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्याचे मेसेजेस व्हायरल झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी थेट शाळेवर हल्ला केला. शाळेवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. जमावाने ‘जय श्री राम’चा नारा देत शाळेच्या खिडक्या फोडल्या, बाकं, टेबल आणि खुर्च्या तोडल्या. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला रोखलं. तत्पूर्वी या जमावाने मुख्याध्यापकांना मारहाण केली तसेच त्यांच्या कपाळावर भगवा टिळा लावला.