आंध्र प्रदेशात विविध ठिकाणी स्वतंत्र तेलंगणा राज्याची मागणी करणाऱ्यांनी बंद पाळला. तेलंगणा राष्ट्र समितीतर्फे हा बंद पाळण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. केंद्र सरकार तेलंगणाप्रकरणी जी उदासीनता दाखवत आहे, त्याच्या निषेधार्थ हा बंद पाळला असल्याचे तेलंगणा राष्ट्र समितीने स्पष्ट केले. या बंदला उत्तम प्रतिसाद लाभला होता. विविध शाळा- महाविद्यालये, दुकाने, कार्यालये, राज्य परिवहन सेवेच्या बसेस बंद होत्या.

Story img Loader