तेलंगणा पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. तेलंगणा पोलिसांकडून गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. याची यशस्वी चाचणीदेखील करण्यात आली असून यामध्ये गरुड पक्षाला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याप्रमाणे ते काम करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात धोकादायक ड्रोनच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित गरुड तैनात करण्याची योजना आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गरुडांना दररोज एक तासाचे प्रशिक्षण दिले जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेदरलँड, फ्रान्स या देशासह युरोपियन देशामध्ये अशा प्रकारचा उपाय योजिला जातो. आता युरोपियन देशाची प्रेरणा घेऊन गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? याबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. हे प्रशिक्षण जवळपास मागील तीन वर्षांपासून देण्यात येत होते. अखेर गरुड पक्षी यामध्ये यशस्वी झाले आहेत. तेलंगणातील हैदराबादच्या मोइनाबाद येथील इंटीग्रेटेड इंटेलिजेंस प्रशिक्षण अकादमी (IITA) या ठिकाणी पोलिस महासंचालक रवी गुप्ता आणि वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकारी यांच्या उपस्थितीत एका प्रशिक्षित गरुड पक्षाने एका ड्रोनला खाली पाडले. गेल्या तीन वर्षांपासून या गरुड पक्षांना प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षणामध्ये हे गरुड पक्षी यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा : “सर्वाधिक इलेक्टोरल बाँड कुठल्या पक्षाला हे सगळ्यांना माहीत आहे, पंतप्रधान कार्यालय…”, संजय राऊत यांचा टोला

देशातली पहिलीच घटना

अनेकदा राजकीय नेत्यांच्या व्हीव्हीआयपी भेटी, सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमादरम्यान शत्रूच्या ड्रोनच्या धोका असतो. मात्र, यासाठी आता या प्रशिक्षित गरुड पक्षांचा वापर करण्याची तेलंगणा पोलिसांची योजना आहे. हे प्रशिक्षित गरुड पक्षी अशा ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या भेटी, सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमादरम्यान तैनात केले जाऊ शकतात. तेलंगणा पोलिसांकडून गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे या पुढील काळाच शत्रूच्या ड्रोनला लक्ष्य करण्यासाठी प्रशिक्षित गरुड तैनात असू शकतात. अशा प्रकारच्या कारवाईसाठी देशातील पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे.

प्रात्यक्षिकाच्या व्हिडिओमध्ये काय दिसते?

विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या तीन गरुड पक्षांपैकी एक गरुड पक्षी एका शेडवर बसलेला व्हिडिओमध्ये दिसतो आहे. यानंतर एक ड्रोन अचानक आकाशात झेपावतो. यानंतर लागलीच हा प्रशिक्षित गरुड पक्षी त्या ड्रोनच्या दिशेने जाऊन त्याला पकडतो आणि खाली एका स्थळी घेऊन जातो. हे सर्व काम हा गरुड पक्षी अगदी अचूकपणे पूर्ण करतो. या तीन गरुडांपैकी दोन गरुडांचे वय दोन वर्षे तर दुसऱ्याचे वय दोन वर्षांपेक्षा थोडे जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तीनही गरुड पाळत ठेवण्यात सक्षण असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana police has trained a eagles and drones security gkt