आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून राज्याच्या किनारपट्टी तसेच रायलसीमा भागात तणावाचे वातावरण आहे. अंखड आंध्र प्रदेश राज्याच्या समर्थकांनी स्वतंत्र तेलंगणाला विरोध करीत गुरुवारीही जोरदार निदर्शने केली.
कॉंग्रेसने स्वतंत्र तेलंगण राज्याची घोषणा केल्यानंतर २३व्या दिवशीही रायलसीमा शहराच्या कुरनूल भागात झालेल्या निदर्शनांमध्ये विद्यार्थी आणि समाजाच्या विविध स्तरावरील लोकांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला.
आंध्र प्रदेश राज्याला पाठिंबा दर्शविणाऱ्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी २ स्पटेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला आहे. तर अनेक सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी १२ ऑगस्टपासूनच संपाचे हत्यार उगारलेले आहे. वकिलांनीही आंदोलनाची भूमिका घेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमांध्र जिल्ह्य़ामध्ये शिक्षकांनीही गुरुवारपासून संप पुकारल्यामुळे शाळांमधील कामकाज विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे.
विद्यार्थी संयुक्त कृती समितीने जल सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे. तसेच रायलसीमा आणि किनारपट्टी भागातील केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देऊन कॉंग्रेसप्रणीत सरकारवर दबाव वाढवावा, अशी मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा