Telangana SLBC Tunnel Collapse LIVE Updates : तेलंगणा या ठिकाणी झालेल्या बोगदा दुर्घटनेत आठ कामगार अडकून पडले आहेत. या आठ कामगारांना वाचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. शनिवारी तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफट बँक कॅनॉल बोगदा प्रकल्पाचा भाग कोसळला. या ठिकाणी आठ कामगार अडकून पडले आहेत. मागच्या ४८ तासांपासून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या गुमला जिल्ह्यातील चार कामगारांमध्ये सदर पोलीस स्टेशन परिसरातील तिर्रा गावातील रहिवासी संतोष साहू, घाघरा पोलीस स्टेशन परिसरातील खांभिया कुंबा, टोली येथील रहिवासी अनुज साहू, रायडीह पोलीस स्टेशन परिसरातील कोबी, टोली गावातील रहिवासी जगता खेश आणि पालकोट पोलीस स्टेशन परिसरातील उमदा नाकती, टोली गावातील रहिवासी संदीप साहू यांचा समावेश आहे. या विषयीच्या घडामोडी काय आहेत आपण जाणून घेऊ लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-
Telangana SLBC Tunnel Collapse LIVE Updates |तेलंगणा बोगदा दुर्घटनेमुळे अडकून पडलेल्या आठ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु, नेमके काय उपाय?
बचाव कार्यात नेमक्या काय अडचणी येत आहेत?
बोगद्यात चिखल आणि पाणी साठलं आहे. त्यामुळे बोगद्यात मशीनद्वारे मदतकार्य करण्यास अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाण बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बरंच आत आहे. त्यामुळेही तिथे मशीन नेऊन बचाव कार्य करण्यास अडचणी येत आहेत.
आतमध्ये जे मजूर अडकले आहेत त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मजुरांकडून सुरक्षित असल्याचा काही संदेशही मिळालेला नाही. त्यामुळे बचाव कार्य करणाऱ्या टीमची चिंता वाढली आहे. कारण हा नेमका अंदाज आता लावता येत नाहीये की मजूर आतमध्ये कुठल्या स्थितीत आहेत?
बोगद्याच्या आत पाणी वाढल्याने बचावकार्यात अडथळे
सूत्रांनी सांगितले की बोगद्याच्या आत, विशेषत: दुर्घटना साइटजवळील परिस्थिती पाण्याच्या गळतीमुळे चिंताजनक झाली आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाय योजले जात आहेत. बोगद्याच्या आतील चिखल आणि जो काही ढिगारा किंवा तुकडे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी पर्यायी उपाय केले जात आहेत असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. बोगद्यात नैसर्गिक खडक हलल्याने पाणी वाढलं आहे. त्यामुळे चिखल झाला आहे असंही एका अधिकाऱ्याने सांगितलं. बोगद्यात त्यामुळे जड यंत्रं पाठवण्यास अडचणी येत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
आमचे सहकारी वाचतील अशी अपेक्षा आहे, कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांबाबत काय म्हणाले?
तेलंगणातील एसएलबीसी प्रकल्पाच्या बोगद्याच्या आत अडकलेल्या आठ कर्मचार्यांना वाचविण्याच्या कार्य प्रगतीपथावर आहे. या अपघातातून जे कर्मचारी बचावले आहे त्यांना त्यांचे सहकारीही वाचतील अशी अपेक्षा आहे. आमचे सहकारी वाचतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
आठही कामगारांचा जीव वाचला पाहिजे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो आहे-रेड्डी
तेलंगणाचे मंत्री कोमेटरेड्डी व्यंकट रेड्डी म्हणाले, बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवणं आवश्यक आहे. मी त्यांचा जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतो आहे.
आठ कामगारांचा जीव वाचवण्यासाठी आता रॅट मायनर्सची मदत
तेलंगणातील बोगदा कोसळल्यानंतर आठ कामगार मोडतोडात अडकले आहेत. बोगद्याच्या कोसळलेल्या भागाखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता रॅट मायनिंग करणाऱ्या कामगारांच्या पथकाचा बचाव संघात समावेश करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, हे तेच कामगार आहेत ज्यांना जवळजवळ दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील सिल्कीरा बोगद्याच्या बचाव पथकात तैनात केले गेले होते.
तेलंगणा या ठिकाणी झालेल्या बोगदा दुर्घटनेत आठ कामगार अडकून पडले आहेत. या आठ कामगारांना वाचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. शनिवारी तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफट बँक कॅनॉल बोगदा प्रकल्पाचा भाग कोसळला. या ठिकाणी आठ कामगार अडकून पडले आहेत. मागच्या ४८ तासांपासून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तेलंगणात मोठी दुर्घटना, फोटो- (एक्स सोशल मीडिया सुर्या रेड्डी)