येथील सीमावर्ती भागात दूरध्वनी विभागाचे दोन लाइनमन दुरुस्तीसाठी आले असता ते दहशतवादीच आहेत असे समजून सुरक्षा दलांनी कॅन्टोन्मेंट भागाला वेढा घातला. हे दोनजण दिसल्यानंतर लष्कराला माहिती देण्यात आली व जलद प्रतिसाद दल सक्रिय करण्यात आले व तपासणी सुरू झाली. हे लाईनमन भिंतीवर चढून दूरध्वनी लाइनची दुरूस्ती करीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीसीटीव्ही चित्रीकरण बघितले असता ते दूरध्वनी विभागाचे लाईनमन असल्याचे समजले. पठाणकोट हल्ल्याच्या कटुस्मृती ताज्या असतानाच ही घटना घडल्याने आई-वडील मुलांना घरी नेण्यासाठी शाळेत आले होते. फिरोजपूरचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक हरदयाल सिंग यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी घुसखोरी केली व त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला या अफवा आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नये. २ जानेवारीला पहाटे पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यात सहा अतिरेकी मारले गेले, तर सात सुरक्षा जवान हुतात्मा झाले होते. हे दहशतवादी पंजाबनजीक सीमा ओलांडून आले होते.