तेलगू चित्रपटातील युवा अभिनेता आणि नृत्यूदिग्दर्शक के. विजय याचा नेपाळच्या भूकंपात दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नेपाळला गेलेल्या अभिनेता के.विजयची टीम भूकंपाच्या तावडीत सापडली. आपल्या एसयूव्ही कारमधून इतर सहकाऱयांसोबत चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर परतत असताना भूकंपाच्या तडाख्यात के. विजयचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक किशन यांनी दिली आहे. तर, त्याच्यासोबतचे इतर तिघे जखमी झाल्याचे समजते. के.विजय मूळचा आंध्रप्रदेशचा रहिवासी होता. ‘एतकरम.कॉम’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी २० जणांची टीम नेपाळमध्ये गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telugu actor k vijay 25 dies in aftershock in nepal