नवी दिल्ली : मोदी ३.० सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील कळीची खाती पदरात पाडून घेण्यासाठी तेलुगु देसम व संयुक्त जनता दल (जेडीयू) या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या भाजपशी शुक्रवारी तीव्र वाटाघाटी सुरू होत्या. तेलुगु देसमने लोकसभाध्यक्ष पदासह माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचे समजते. कृषि मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केला आहे. भाजपवर घटक पक्षांनी दबाव वाढवला असला तरी, विविध क्षेत्रांतील पायाभूत विकासांची मंत्रालये सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे खातेवाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गृह, अर्थ, संरक्षण व परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यावर भाजप ठाम असून लोकसभाध्यक्षपदबाबतही तडजोड केली जाणार नसल्याचे समजते. तेलुगु देसमला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा